जळगाव : पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा महाजन यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. फिनेल पिऊन त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय.
आरोग्य मंत्री दीपक सावंत यांचे पीए सुनील माळी यांच्याविरोधात मनीषा महाजन यांनी गेल्या महिन्यात विनयभंगाची तक्रार केली होती. माळी यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी डॉ. महाजन यांनी उपोषणही केलं होतं. त्यानंतर सुनील माळी यांना पीए म्हणून हटवण्यात आलं होतं. पण त्यांच्यावर नंतर कुठलीही कारवाई झाली नाही. आत्महत्येचा प्रयत्न करण्याआधी डॉ. मनीषा महाजन यांनी व्हॉट्सऍपवर सुनील माळी याच्या मानसिक जाच तसेच दबावामुळे आत्महत्या करत असल्याचं नमूद केलंय. दरम्यान महाजन यांच्यावर चाळीसगावमधल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.