सोलापूर : मंत्रालयातल्या उच्चपदस्थाच्या नावे खंडणी वसुलीचा प्रकार समोर आला आहे. अकोल्यातली ही घटना. श्री दत्त मेडीकलच्या संचालकाला 50 हजारांची खंडणी मागण्यात आली.
याप्रकरणी अकोला पोलिसांनी सोलापुरातल्या दोघांना अटक केलीय. एक आरोपी फरार आहे. सुरज काळे हा आरोपी सोलापुरातल्या सेवानिवृत्त पोलीस अधिका-याचा मुलगा असल्याचं समोर आलंय.
दत्त मेडीकलचे संसाचलक प्रकाश सावला यांचा भाचा भुपेश मुंदडा दत्त मेडीकलचं काम सांभाळतात. त्यांना एका ारोपीनं फोन करून तुमच्या दुकानातलं औषध घेऊन एका मुलीचा मृत्यू झाला त्यामुळे शहरातल्या तुमच्या तिन्ही मेडकलचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
ही कारवाई टाळायची असेल तर 50 हजार भरा असं सांगितलं. त्यामुळं मुंदडा यांनी आरोपीकडून खातेक्रमांक घेतला आणि त्यात 500 रुपये टाकले. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार केली. सायबर सेलच्या मदतीनं पोलिसांनी सोलापुरात पथक पाठवून आरोपींना अटक केलीय.
या आरोपींवर अशाच प्रकारचे गुन्हे नागपूर, लातूर आणि नांदेडमध्येही दाखल आहेत. नितीन जाधव, मधुकर गवळी आणि सुरज सुरेश काळे अशी आरोपींची नावे आहेत.