अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला

जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील खरवंडी ,इथे एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत आढळून आलाय. 

Updated: Aug 18, 2016, 04:45 PM IST
अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला title=

अहमदनगर : जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील खरवंडी ,इथे एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत आढळून आलाय. 

या घटनेमुळे पाथर्डी तालुक्यात एकच खळबळ उडालीये. पुजा वारे असं या मुलीचे नाव आहे. ती दहावी मध्ये शिकत होती. 

१५ ऑगस्ट रोजी ही मुलगी बेपत्ता झाली होती आणि आता तिचा मृतदेह आढळून आला आहे.

या मुलीची आत्महत्या आहे की, हत्या असा प्रश्न उपस्थीत होतोय. या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.