दारूच्या नशेत बहिणीवर अत्याचार करणाऱ्या मुलाची आईनंच केली हत्या

बुलडाणा जिल्ह्यातील चिखडी इथं एक धक्कादायक घटना घडलीय... एका वासनांध मुलाला त्याच्या सख्खा आईनंच ठार मारलंय. दारूच्या नशेत आपल्या सख्ख्या बहिणीवर बलात्काराचा प्रयत्न या नराधमानं केला होता. तेव्हा आईनं हे कठोर पाऊल उचललं.

Updated: Oct 29, 2015, 10:50 AM IST
दारूच्या नशेत बहिणीवर अत्याचार करणाऱ्या मुलाची आईनंच केली हत्या title=

चिखली, बुलडाणा: बुलडाणा जिल्ह्यातील चिखडी इथं एक धक्कादायक घटना घडलीय... एका वासनांध मुलाला त्याच्या सख्खा आईनंच ठार मारलंय. दारूच्या नशेत आपल्या सख्ख्या बहिणीवर बलात्काराचा प्रयत्न या नराधमानं केला होता. तेव्हा आईनं हे कठोर पाऊल उचललं.

मुलीची अब्रू वाचविण्यासाठी आईनं मुलावर पहिले तलवारीनं वार केले आणि नंतर गळा दाबून त्याला ठार मारलं. या घटनेनंतर तिनं स्वत: पोलीस स्टेशनमध्ये जावून आत्मसमर्पण केलं.

आणखी वाचा - मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात शुल्लक कारणावरून तलवारीने हल्ला

चिखलीच्या रामानंद नगरमध्ये राहणाऱ्या शोभाबाई शेषराव जाधव यांना कृष्णा आणि ज्ञानेश्वर ही दोन मुलं आणि चार मुली आहेत. २१ वर्षीय कृष्णा हा रिक्षा चालविण्याचे काम करतो, मात्र त्याला दारूचं व्यसन लागल्यानं घरी नेहमीच वाद होत असत. दारूच्या नशेत तो नेहमीच आई आणि दोन बहिणींशी लगट करायचा.

मंगळवारी रात्री दारूच्या नशेत त्यानं तलवारीचा धाक दाखवून, बहिणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिची आरडाओरड ऐकून शोभाबार्इंनी घरात धाव घेतली, मुलाचं दुष्कृत्य पाहून त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी लोखंडी पाईपनं मुलावर हल्ला चढवून, त्याच्या हातातील तलवार हिसकावून घेतली. याच तलावारीनं त्याच्या डोक्यावर, चेहऱ्यावर असंख्य वार केले. त्यामुळं रक्तबंबाळ होऊन कृष्णा जमिनीवर कोसळला. त्यानंतर शोभाबार्इंनी गळा आवळून त्याचा खून केला. मुलाचा खून केल्यानंतर शोभाबार्इंनी आत्मसमर्पण करून, घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली.

आणखी वाचा - नागपुरात २२ वर्षीय तरुणीला रेस्टॉरंटच्या छतावर जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.