आईनेच केली मुलाची हत्या

आईनेच आपल्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक पुण्यात उघडकीस आली आहे. खुनानंतर मृतदेह ताम्हीणी घाटात फेकून देण्यात आला. या प्रकरणी आईसह चुलता आणि इतर तिघे, अशा पाच आरोपींना अटक करण्यात आलीय. 

Updated: Mar 14, 2016, 08:28 AM IST
आईनेच केली मुलाची हत्या title=

पुणे : आईनेच आपल्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक पुण्यात उघडकीस आली आहे. खुनानंतर मृतदेह ताम्हीणी घाटात फेकून देण्यात आला. या प्रकरणी आईसह चुलता आणि इतर तिघे, अशा पाच आरोपींना अटक करण्यात आलीय. 

मृत मुलगा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. अक्षय रामदास मालपोटे असं हत्या करण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे. तो 20 वर्षांचा होता. अक्षय हा व्यसनी होता. नशेमध्ये शेजा-यांबरोबर भांडण आणि शिवीगाळ करत असे. त्यामुळे आरोपींनी संगनमताने त्याचा डोक्यात फरशी घालून खून केला. 

त्यानंतर मृतदेह ताम्हीणी घाटात फेकून दिला. ही घटना तीन महिन्यापूर्वी घडली होती. पुणे पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलनं हा गुन्हा उघडकीस आणला.