'भारत माता की जय कधीच म्हणणार नाही'

भारतात राहत असलो तरी भारत माता की जय कधीच म्हणणार नाही असं अजब विधान खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलंय. 

Updated: Mar 14, 2016, 07:55 AM IST
 'भारत माता की जय कधीच म्हणणार नाही' title=

लातूर : भारतात राहत असलो तरी भारत माता की जय कधीच म्हणणार नाही असं अजब विधान खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलंय. 

आपल्या गळ्यावर कुणी चाकू जरी लावला तरी भारतमाता की जय कदापि म्हणणार नाही असं ओवैसींनी म्हटलंय. लातूरच्या उद्गीरमधल्या सभेत त्यांनी हे भडकाऊ भाषण केलंय.

पुणे जर्मन बेकरीतील प्रमुख आरोपी हिमायत बेग आणि इशरत जहाँ हे दहशतवादी निर्दोष असल्याचं सांगत त्यांच्या कुटुंबीयांसोबत उभं राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.