औरंगाबादमध्ये एमपीएससीचा पेपर फुटला, १४ जणांना अटक

औरंगाबादमध्ये एमपीएससीचा पेपर फुटलाय. कर सहाय्यक परीक्षेचा पेपर विकताना पोलिसांनी १४ जणांना अटक केलीय. 

Updated: Jun 7, 2015, 04:13 PM IST
औरंगाबादमध्ये एमपीएससीचा पेपर फुटला, १४ जणांना अटक title=

औरंगाबाद: औरंगाबादमध्ये एमपीएससीचा पेपर फुटलाय. कर सहाय्यक परीक्षेचा पेपर विकताना पोलिसांनी १४ जणांना अटक केलीय. 

आज पहाटे सिडको भागातील एका घरावर छापा टाकून पोलिसांनी या आरोपींना जेरबंद केलंय. त्यांच्याकडून आज होणाऱ्या एमएपीएससी परीक्षेचा पेपर ही जप्त करण्यात आलाय. आजचा पेपर आणि आरोपींकडे असणारा पेपर सारखा आहे का? याची  पोलीस आणि जिल्हाधिकारी शहानिशा करतायेत.

या आरोपींना हा पेपर व्हॉट्स अॅपवर आला होता. त्याचं प्रिंटआऊट काढून हा पेपर १० लाख रूपयांना विकला जात होता, अशी माहिती मिळतेय. दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये ८ विद्यार्थी आहेत तर २ बॉडीगार्ड, 'त्या' घरचा मालक आणि इतर काही लोकांना अटक करण्यात आलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.