ठाण्यात हुक्का पार्लरवर छापा, ५३ जण ताब्यात

सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या ठाणे शहरामध्ये खुलेआम हुक्का पार्लर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय. पोलिसांनी शनिवारी रात्री टाकलेल्या छाप्यामध्ये ५३ जणांना ताब्यात घेण्यात आलंय.

Updated: Jun 7, 2015, 10:27 AM IST
ठाण्यात हुक्का पार्लरवर छापा, ५३ जण ताब्यात title=

ठाणे: सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या ठाणे शहरामध्ये खुलेआम हुक्का पार्लर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय. पोलिसांनी शनिवारी रात्री टाकलेल्या छाप्यामध्ये ५३ जणांना ताब्यात घेण्यात आलंय.

ठाण्यातील फ्लोवर व्हॅली परिसरात एक हुक्का पार्लर अनधिकृतपणे चालत असल्याची माहिती राबोडी पोलिसांना मिळाली. रात्री 'मिड नाईट' या रेस्टॉरंटवर पोलिसांनी छापा टाकून १४ मुली ११ ग्राहक ६ वेटर १ मॅनेजर असे एकूण ५३ जणांना ताब्यात घेण्यात आलं. 

या आधी अशी कारवाई मुलुंडमध्ये करण्यात आली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.