मुंबई - नागपूर... केवळ १० तासांत!

राज्यातल्या जनतेसाठी एक गूड न्यूज... मुंबई-नागपूरचा प्रवास आता केवळ १० तासांचा होणार आहे.

Updated: Aug 1, 2015, 10:47 AM IST
मुंबई - नागपूर... केवळ १० तासांत! title=

मुंबई : राज्यातल्या जनतेसाठी एक गूड न्यूज... मुंबई-नागपूरचा प्रवास आता केवळ १० तासांचा होणार आहे.

मुंबई ते नागपूर सहा पदरी एक्स्प्रेस-वे बांधणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलीय. हा ८०० किमीचा रस्ता बांधण्यासाठी ३० हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. केंद्रासोबत भागीदारी करुन हा प्रकल्प पूर्ण करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलंय. 

सध्या, मुंबईहून नागपूरला जाण्यासाठी....
सध्याचा रस्ते मार्ग - १८ ते २० तास
रेल्वे मार्ग - १२ ते १५ तास
एक्सप्रेस-वे - १० तास 

एवढा वेळ सध्या लागतो... पण, मुंबई - नागपूर एक्सप्रेस वेनंतर हा कालावधी कमी होईल. अर्थातच, या इन्फ्रास्ट्रक्चरचा फायदा उद्योग धंद्यांसाठीही होणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.