कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं २७ गावांच्या २१ प्रभागांमध्ये उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं संघर्ष समितीची निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची खेळी फोल ठरलीय.
अधिक वाचा : कल्याण-डोंबिवलीत शिवसेना-भाजपचे स्वतंत्र उमेदवार
अखेर पर्याय समोर नसल्यामुळं संतापलेल्या संघर्ष समितीनं शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात उमेदवार उभे केले आहेत. दोन्ही गट आमने सामने आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोघांच्या उमेदवारांमध्ये बाचाबाचीही झाली.
अधिक वाचा : कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीत आतापर्यंत ३३४ उमेदवार रिंगणात, चुरस वाढलीय
२७ गावांपैकी मनेरी वसार आणि भोपर संदपमध्ये एकाही उमेदवारानं अर्ज भरलेला नाही. त्यामुळं तिथं पुन्हा पोटनिवडणूक घ्यावी लागेल. तर आशेरे चिंचपाडामध्ये एकच अर्ज आल्यानं त्या उमेदवाराची बिनविरोध निवड होणार आहे. उर्वरित महापालिका वॉर्डांमध्ये बहुरंगी लढती रंगणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.