गुंड अक्कू यादव हत्याप्रकरणातील १८ आरोपींची निर्दोष मुक्तता

संपूर्ण देशात खळबळ उडवणाऱ्या अक्कू यादव हत्या प्रकरणाचा निकाल आज लागलाय. अक्कू यादव हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलीये. याप्रकरणी पोलिसांनी २१ जणांविरोधात गुन्हे दाखल केले होते. यामध्ये १४ पुरुष आणि ७ महिलांचा समावेश होता.

Updated: Nov 10, 2014, 05:56 PM IST
गुंड अक्कू यादव हत्याप्रकरणातील १८ आरोपींची निर्दोष मुक्तता title=

नागपूर: संपूर्ण देशात खळबळ उडवणाऱ्या अक्कू यादव हत्या प्रकरणाचा निकाल आज लागलाय. अक्कू यादव हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलीये. याप्रकरणी पोलिसांनी २१ जणांविरोधात गुन्हे दाखल केले होते. यामध्ये १४ पुरुष आणि ७ महिलांचा समावेश होता.

१३ ऑगस्ट २००४ रोजी न्यायालयाच्या आवारात अक्कूचा अतिशय निर्घृणपणे आणि पोलिसांच्या उपस्थितीत खून करण्यात आला होता. नागपूरच्या कस्तुरबा नगर भागात राहणाऱ्या भारत उर्फ अक्कू कालीचरण यादवच्या दहशतीमुळं तेथील रहिवासी त्रस्त होते. खून, बलात्कार, जबरी चोरी, घरफोडी असे अनेक गंभीर स्वरूपाचे एकूण २६ गुन्हे त्याच्यावर होते. मात्र पोलीस हातावर हात घेऊन बसले होते. यादवला सुनावणीसाठी कोर्टात आणलं तेव्हा त्याच्यासोबत दोन हवालदार होते. चिडलेल्या जमावानंच अक्कूची हत्या केली होती. मात्र सबळ पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय.

तब्बल १० वर्षांनी या ऐतिहासिक प्रकरणावर सत्र न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं आज निकाल दिला. जमावानं यादवला पोलीस गराड्यातून बाहेर ओढून दगड, काठ्या, चाकूनं वार करत ठार केलं होतं. कोर्टाच्या आवारात अक्कूवर जमावानं तब्बल ७३ वार केले होते. याप्रकरणी एकूण २१ आरोपींवर खटला दाखल होता. 

मात्र यापैकी तीन आरोपींचा मृत्यू झाल्यानं उर्वरित १८ जणांना न्यायालयानं निदोर्ष ठरवलं आहे. विशेष म्हणजे ज्या न्यायालयाच्या आवारात अक्कू यादवची हत्या झाली होती, त्याच न्यायालयानं सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलं आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.