नागपूर महापालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकाचे निधन

नागपूर महानगर पालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक निलेश कुंभारे यांचं आज निधन झालं. ते अवघ्या ३४ वर्षाचे होते. 

Updated: Apr 10, 2017, 01:20 PM IST
नागपूर महापालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकाचे निधन

नागपूर : नागपूर महानगर पालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक निलेश कुंभारे यांचं आज निधन झालं. ते अवघ्या ३४ वर्षाचे होते. 

कुंभारे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक पस्तीसमधून भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. नागपुरमधील महापालिका निवडणुकीत भाजपने मोठं यश मिळवलं होतं. 

गेल्या १२ दिवसांपासून कुभांरे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या फुफ्फुसाला संसर्ग झाल्याने त्यांच्यावर उपचार केले जात होते. मात्र या उपचाराला अखेरपर्यंत यश आलं नाही आणि रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.