पुणे : पुण्यामध्ये शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं गुरुजन सन्मान पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. माणिकचंदचे रसिकलाल धारीवाल यांच्यासह अभिनेता नाना पाटेकर, भास्कर आव्हाड, शरद हर्डीकर यांनाही गुरुजन पुरस्कारांने गौरवण्यात आलं.
यावेळी नाना पाटेकर यांनी चौफेर फटकेबाजी केली. माणिकचंदच्या वाट्याला गेलो नाही म्हणून तरुण राहिलो असं नानांनी यावेळी म्हटलं. शरद पवार आपले हिरो असल्याचंही नानानं यावेळी आवर्जून सांगितलं. तर अजित पवारांची भाषणं ऐकून गहिवरुन येत असल्याचं नाना म्हणाले. धरणं भरल्याच्या वक्तव्यावरूनही नाना पाटेकरांनी अजित पवारांना चिमटे काढले.