पुणेकरांची पाणीकपात रद्द

पुणेकरांची पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. सोमवारपासून पुणे शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

Updated: Jul 16, 2016, 08:02 PM IST
पुणेकरांची पाणीकपात रद्द  title=

मुंबई : पुणेकरांची पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. सोमवारपासून पुणे शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. 

पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी ही घोषणा केली आहे. पुण्यात सध्या दिवसाआड पाणीकपात सुरु आहे. मात्र सोमवारपासून पुणेकरांची या दिवसाआड पाणीकपातीमधून सुटका होणार आहे. 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुजन पुरस्कार सोहळ्यात पुणेकरांची दिवसाआड पाणीकपातीमधून सुटका करण्याच्या सूचना महापौरांना केल्या होत्या. त्यानंतर लगेचच काही वेळात पुणेकरांना ही गुडन्यूज मिळाली आहे.