नागपूरच्या ५२ व्या महापौर नंदा जिचकार यांनी पदभार सांभाळला

नागपूरच्या ५२ व्या महापौर म्हणून भाजप नगरसेविका नंदा जिचकार यांनी आज पदभार सांभाळला. मावळते महापौर प्रवीण दटके यांच्याकडून त्यांनी महापौर पदाची सूत्रे घेतली. 

Updated: Mar 7, 2017, 10:12 AM IST
नागपूरच्या ५२ व्या महापौर नंदा जिचकार यांनी पदभार सांभाळला title=

नागपूर : नागपूरच्या ५२ व्या महापौर म्हणून भाजप नगरसेविका नंदा जिचकार यांनी आज पदभार सांभाळला. मावळते महापौर प्रवीण दटके यांच्याकडून त्यांनी महापौर पदाची सूत्रे घेतली. 

नवीन प्रकल्प सूर करताना सुरु असलेली कामे आधी संपवण्यावर आपला भर असेल हे त्यांनी स्पष्ट केले. आर्थिक दृष्ट्या अडचणीत आलेल्या नागपूर महानगर पालिकेचा महसूल वाढवण्याकरता आपण प्रयत्न करू असेल असे देखील त्या म्हणाल्यात. 

उपमहापौर दिपराज पार्डीकर यांनीही आपल्या पदाची सूत्रे सांभाळली. पालिकेच्या सिव्हिल लाईन्स भागातील मुख्यालयाच्या हिरवळीवर झालेल्या या सोहळ्याला शहरातील आमदारांनी आणि माजी महापौरांनी हजेरी लावली.