नाशिकमध्ये पाच वर्षांत चार महापौर होणार?

नाशिक महापालिका इतिहासात प्रथमच पाच वर्षात चार महापौर होणार आहेत. त्यामुळे भाजपच्या कार्यकाळात चार नगरसेवकांना महापौरपदाची संधी मिळणार आहे. असा प्रस्ताव प्रदेश स्तरावर पाठवण्यात आल्याने आता प्रदेशाध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलंय. 

Updated: Mar 7, 2017, 10:03 AM IST
नाशिकमध्ये पाच वर्षांत चार महापौर होणार? title=

योगेश खरे, नाशिक : नाशिक महापालिका इतिहासात प्रथमच पाच वर्षात चार महापौर होणार आहेत. त्यामुळे भाजपच्या कार्यकाळात चार नगरसेवकांना महापौरपदाची संधी मिळणार आहे. असा प्रस्ताव प्रदेश स्तरावर पाठवण्यात आल्याने आता प्रदेशाध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलंय. 

नाशिक महसूल आयुक्ताकडे जमलेल्या भाजपचे नगरसेवकांची सध्या एकमताने संभाजी मोरूस्कर यांची गटनेतेपदी निवड केली आहे. यावेळी झालेल्या बैठकीनंतर महापौरपदासाठी रंजना भानसी आणि उपमहापौरपदासाठी प्रथमेश गीते यांची एकमताने प्रदेश भाजपकडे शिफारस करण्यात आली.

पहिल्यांदाच महापौरपदाचा कार्यकाळ हा सव्वा वर्षासाठी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. प्रदेश पातळीवर निर्णय होऊन 14 तारखेला होणाऱ्या निवडीत उमेदवार जाहीर होईल, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी दिलीय. 

शहरातील कार्यकारिणीतील गटबाजीचा मोठा फटका मोठ्या प्रमाणात बसू शकतो. नाराजी टाळण्यासाठी चार महापौर करण्याचा इलाज केल्याची चर्चा आहे.