नवी मुंबई आयुक्त मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर

नवी मुंबई आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठरावाच्यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेविकांकडून जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. 105 विरुद्ध 6 मतांनी ठराव मंजूर झाला.  

Updated: Oct 25, 2016, 02:09 PM IST
नवी मुंबई आयुक्त मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर title=

नवी मुंबई : आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठरावाच्यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेविकांकडून जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. 105 विरुद्ध 6 मतांनी ठराव मंजूर झाला. भाजपने मतदानाच्यावेळी तटस्थ भूमिका घेतली.

अविश्वास ठराव मंजूर झाल्याने आयुक्तांचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे महापौर यांनी केली आहे. दरम्यान, सुरुवातीपासून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात आवाज उठवणाऱ्या भाजपचा मतदानात सहभाग घेतला नाही. त्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका बजावली. राष्ट्रवादीने मांडलेला ठराव 105 विरुद्ध 6 मतांनी मंजूर झाला. राष्ट्रवादीला काँग्रेसने साथ दिली. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि अपक्षांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले.

ठरावनंतर भाजपचे नगरसेवक मुंढेंच्या बाजूनं बोलायला उभे राहिल्यावर सभागृहात गोंधळ सुरू झाला. मुंढेविरोधात ठराव मंजूर झालेला असला तरी तो फेटाळण्याचा राज्य सरकारला पूर्ण अधिकार आहे. कायद्यातील तरतुदीनुसार मुंढेना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभय देतील अशी दाट शक्यता वर्तवण्यात येते आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून तुकाराम मुंढे यांना पाठिंबा दर्शविनारे आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक होती. त्यामुळे मंगळवारी नवी मुंबई पालिका मुख्यालयामध्ये 
आणि मुख्यालयाबाहेर कायदा तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी पोलिसांनी जमावबंदी आदेश जारी केला होता. मुख्यालयाच्या १०० मीटरपर्यंत बंदी होती. याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. त्यामुळे परिसरात पोलीस छावणीचे स्वरूप दिसत होते.

झी २४ तास LIVE अपडेट

12:37 PM
नवी मुंबई : आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठरावाच्यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेविकांकडून घोषणाबाजी, ठराव मंजूर झाल्याने जिल्ह्याधिकाऱ्यांकडे आयुक्तांचे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावे - राष्ट्रवादीचे महापौर

12:34 PM
नवी मुंबई : सुरुवातीपासून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात आवाज उठवणाऱ्या भाजपचा मतदानात सहभाग नाही
 
12:32 PM
नवी मुंबई : आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर, राष्ट्रवादीने आणला होता ठराव
12:32 PM

नवी मुंबई : आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात 105 विरुद्ध 6 मतांनी ठराव मंजूर

09:14 AM
नवी मुंबई : मी सुट्टीवर जाणार नाही : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे

07:24 AM
नवी मुंबई : महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात आज अविश्वास ठराव दाखल होणार, शिवसेनेची भूमिक स्पष्ट नाही, मनसेचा मुंढेना पाठिंबा