पाण्याच्या टाकीच्या भूमीपूजनावरून रंगला राष्ट्रवादी-भाजपात सामना

पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप मधल्या या संघर्षाची झलक आज पहायला मिळाली. 

Updated: Oct 17, 2016, 12:07 PM IST
पाण्याच्या टाकीच्या भूमीपूजनावरून रंगला राष्ट्रवादी-भाजपात सामना title=

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप मधल्या या संघर्षाची झलक आज पहायला मिळाली. 

उद्घाटन समारंभाच्या वादावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांसमोर ठाकले. दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी झाली. भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवार यांची गाडी अडवण्याचा देखील प्रयत्न केला. 

कोंढवा भागात महापालिका बांधणार असणाऱ्या पाण्याच्या टाकीचे भूमीपूजन अजित पवार यांच्या हस्ते होते. मात्र, उद्घाटन पत्रिकेत पालकमंत्री गिरीश बापट यांचे नाव टाकण्यात आले नाही. तसेच महापालिकेच्या इतर कार्यक्रमात देखील गिरीश बापट याचं नाव टाकण्यात आलेलं नाही. त्याचा निषेध म्हणून भाजपने हे आंदोलन केलं.