पिंपरी-चिंचवडच्या प्रभाग क्र २८मध्ये राष्ट्रवादीचे जोडपे विजयी

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठीची मतमोजणी सुरु आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या महापालिकेत सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे. 

Updated: Feb 23, 2017, 11:57 AM IST
पिंपरी-चिंचवडच्या प्रभाग क्र २८मध्ये राष्ट्रवादीचे जोडपे विजयी title=

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठीची मतमोजणी सुरु आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या महापालिकेत सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे. 

महापालिकेतील प्रभाग क्र २८चे निकाल हाती आले असून यात दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेस तर दोन जागा भाजपने मिळवल्यात.

या प्रभागात राष्ट्रवादीचे एक जोडपे विजयी झालेय. या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे विठ्ठल उर्फ नाना काटे आणि त्यांच्या पत्नी शीतल काटे विजयी झालेत.