जयंत पाटील यांनी शिवसेनेला डिवचले...

  बाळासाहेबांचे खरे गुण असतील आणि जर खरे वाघ असतील तर 23 तारखेला शिवसेना राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेईल, मात्र तसं झालं नाही तर ते कागदी वाघ हे सिद्ध होईल असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केलंय. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 9, 2017, 11:00 PM IST
 जयंत पाटील यांनी शिवसेनेला डिवचले... title=

 सांगली :   बाळासाहेबांचे खरे गुण असतील आणि जर खरे वाघ असतील तर 23 तारखेला शिवसेना राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेईल, मात्र तसं झालं नाही तर ते कागदी वाघ हे सिद्ध होईल असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केलंय. 

सांगली जिल्ह्यातल्या ढवळी इथल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जयंत पाटील यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडलंय. भाजपचं संख्याबळ म्हणजे राजकीय सूज असल्याची टीका त्यांनी केलीय. 

 

या सभेत काय बोलले जयंत पाटील पाहा...

सांगली :- देवेंद्र फडणवीस यांची जुनी भाषण मी तुम्हाला आणून देतो तुम्ही वाचा : ती वाचली की या ठिकाणी भाजपाचे डिपॉझिट जर जप्त झालं नाही, तर माझं नाव बदलून टाका

 शिवसेनेत खरा वाघ असेल तरच 23 तारखेला शिवसेना पाठिंबा काढून घेईल : मग भाजपा मध्ये गेलेल्याना पाश्चाताप होईल : 
कॉन्ट्रकटर असणारेच लोक, हे पक्ष बदलत असतात : राजकारणात चढ उतार येत असतात, मात्र सत्ता गेली म्हणून पक्ष बदलणं हे योग्य नसत 

भाजपाच्या लाटेचा काळ ओसरला : लाट असताना सुद्धा भाजपाचे राज्यात स्पष्ट बहुमत येईल इतके आमदार निवडून आले नाहीत : आणि जे आमदार निवडून आले त्यातील अर्धे निम्मे हे आयात केलेले नेते होते 

भाजपाचे मुख्यमंत्री हे गुंडांना पक्षात घेताना मागे पुढे बघत नाही 

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेकांवर भ्रष्टयाचाराचे आरोप करत आहेत : याचा अर्थ भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष भ्रष्ट्राचारी आहेत  आणि त्याचा पुरावा ते दोघेच मुंबईतील प्रचार सभेत देत आहे 

आयाराम-गायराम यांना जनता जागा दाखवेल : निष्ठा नसलेले कार्यकर्ते, हे अन्य पक्षात जात असतात, उलट ते गेले ते चांगलेच झाले कारण आत्ता सज्जा आणि खऱ्या कार्यकर्त्यांना पक्षात न्याय मिळेल : 

नेत्यांच्या मागे पुढे फिरणारे आणि फायदा करून घेण्यासाठीच जवळ आसणारेच लोक वारंवार पक्ष बदलत असतात 

 येवढं चिंगुस सरकार यापूर्वी कधीच महाराष्ट्रात नव्हतं : दुष्काळी भागाला पाणी देत नाहीत, मात्र निवडणूका आल्या की मात्र पाणी सोडतात 

 राष्ट्रवादीतून, भाजपा मध्ये गेलेल्या पहिल्या बॅचचा अनुभव वाईट आहे : त्यांची कामे भाजपात होत नाहीत : भाजपा नेते त्यांचा फोन पण उचलत नाहीत : त्यामुळे भाजपात गेलेल्या पहिल्या बॅच मधील नेते हे राष्ट्रवादीला आम्हांला आतून मदत करतील

बाळासाहेबांचे खरे गुण जर उद्धव ठाकरे यांच्यात असतील, आणि हे जर खरे वाघ असतील तर, 23 तारखेला शिवसेना, राज्यसरकारचा, पाठिंबा काढून घेईल : मात्र तसे झाले नाही तर मात्र तो कागदी वाघ आहे हे सिद्ध होईल. 

भाजपाच संख्याबळ म्हणजे राजकीय सूज आहे : तिकडे गेलेले परत कधी इकडे येतील हे कळणार पण नाही