नेरुळ हत्या प्रकरणी दोन उपनिरीक्षकांना निलंबित, दोघे अटकेत

नवी मुंबईत अल्पवयीन मुलाला मारहाण करुन हत्या प्रकरणी नेरूळ पोलिस स्टेशनच्या दोन उपनिरीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. 

Updated: Jul 21, 2016, 01:27 PM IST
नेरुळ हत्या प्रकरणी दोन उपनिरीक्षकांना निलंबित, दोघे अटकेत title=

मुंबई : नवी मुंबईत अल्पवयीन मुलाला मारहाण करुन हत्या प्रकरणी नेरूळ पोलिस स्टेशनच्या दोन उपनिरीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. 

योगेश माने, सोनाली राजगरू अशी निलंबित केलेल्यांची नावं आहेत. या प्रकरणातील  मुलीला ताब्यात घेण्यात आलं असून तीला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

पोलिसांनी याप्रकरणी आणखी दोघाजणांना अटक केलीय. त्यामुळे याप्रकरणी आतापर्यंत एकूण ८ जणांना अटक करण्यात आलीय. या प्रकरणी  आज विधीमंडळातही विरोधक आक्रमक झाले. सरकारनं याप्रकरणी उत्तर द्यावं अशी मागणी आज विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेंनी केली.