IPL 2024 Mega Auction Rohit Sharma To Join RCB: इंडियन प्रिमिअर लीग 2025 च्या पर्वापूर्वी आयपीएलमधील अनेक संघ सध्या कर्णधाराच्या शोधात आहेत. आयपीएल आधीच्या मेगा ऑक्शनमध्ये हे सर्वच संघ उत्तम कर्णधार संघात घेण्याचा प्रत्येक मालकाचा प्रयत्न असले. असं असतानाच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु म्हणजेच आरसीबीचा कर्णधार फॅफ ड्युप्लेसिस सुद्धा जुलैमध्ये 40 वर्षांचा होणार आहे. म्हणूनच आरसीबीसुद्धा 2025 च्या पर्वामध्येच नवीन कर्णधार शोधत असल्याची चर्चा आहे. काही बातम्यांनुसार तर आरसीबीची नजर के. एल. राहुलवरही असून त्याला पुन्हा संघात घेतलं जाऊ शकतं अशी शक्यता आहे. मात्र भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने तर अगदीच हटके सजेशन देत आरसीबीने मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माला संघात समावून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. तशी चर्चा करुन त्याला संघात घ्यावं आणि कर्णधार करावं असा सल्ला दिला आहे. आता याच सल्ल्यावर बंगळुरुच्या संघातील माजी स्फोटक फलंदाज ए. बी. डिव्हिलियर्सने प्रतिक्रिया नोंदवली आहे.
रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडू शकतो अशी जोरदार चर्चा आहे. रोहित शर्माला संघात सामाजून घेण्यासाठी पंजाब किंग्जबरोबर लखनऊ सुपर जायंट्सचा संघही विचारात आहे. मात्र कैफने 'स्टार स्पोर्ट्स'शी बोलताना, सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेत रोहित शर्माला सर्वोत्तम उपयोग आरसीबीला करुन घेता येईल. रोहितशी चर्चा करुन त्याला संघात येण्यास मनवलं पाहिजे असं कैफचं म्हणणं आहे. रोहित आरसीबीला चषक जिंकवून देऊ शकतो असं कैफने म्हटलं आहे. "आरबीसीने 100 टक्के हा चान्स घेतला पाहिजे. काहीही झालं तरी त्यांनी त्याला (रोहित शर्माला) संघाचं कर्णधारपद स्वीकारण्यासाठी राजी केलं पाहिजे. प्लेइंग इलेव्हन कशी निवडावी हे रोहितला चांगलेच ठाऊक आहे. रोहितचा आरसीबीमध्ये समावेश जाला तर त्याचा संघाला नक्कीच फायदा होईल. कदाचित त्यांचा चषकाचा दुष्काळ संपेल असं मला वाटतं," असं मत कैफने नोंदवलं.
याचसंदर्भात डिव्हिलियर्सला त्याच्या युट्यूब चॅनेलवरील लाइव्ह सेशनदरम्यान चाहत्यांनी प्रश्ना विचारला. रोहित शर्मा बंगळुरुच्या संघात येईल का? हा प्रश्न डिव्हिलियर्सने हसवून उडवून लावला. रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या संघात येण्याची शक्यता केवळ 0.1 टक्के इतकी आहे, असं डिव्हिलियर्सने म्हटलं आहे.
नक्की वाचा >> सूर्या, बुमराह नव्हे तर 'या' खेळाडूच्या 'त्या' कृतीने T20 वर्ल्डकप Final जिंकलो; रोहितने सांगितलं सत्य
"रोहितसंदर्भातील हे विधान ऐकून मला हसू आलं. रोहित मुंबई इंडियन्समधून आरसीबीमध्ये आला तर ती फारच मोठी बातमी असेल. हे असं घडलं तर हे प्रकरण हार्दिक पंड्याच्या प्रकरणापेक्षाही मोठं असेल. तुम्ही फक्त असं घडल्यावर बातम्यांच्या हेडलाइन्स काय असतील विचार करा. हार्दिक गुजरातमधून पुन्हा मुंबईत दाखल झाला. मात्र हे काही फार मोठं सप्राइझ नव्हतं. मात्र रोहित शर्मा मुंबईमधून आरसीबीच्या संघात गेला तर... अरे बापरे... कसं सांगू तुम्हाला! पण मला नाही वाटत असा काही पर्याय उपलब्ध आहे. रोहित शर्माला मुंबई रिलीज करेल असं वाटत नाही. असं होण्याची शक्यता शून्य किंवा 0.1 टक्के इतकी आहे," असं डिव्हिलियर्स म्हणाला.
तसेच फॅप ड्युप्लेसिस हाच यंदाच्या पर्वात आरसीबीचा कर्णधार राहील असंही डिव्हिलियर्सने म्हटलं आहे. "वय हे केवळ आकडेवारी असतं. मला नाही वाटतं की तो 40 वर्षाचा झाला हा अडचणीचा मुद्दा आहे. तो अजून काही पर्व सहज खेळू शकतो. आधीही अनेकजण असं खोळले आङेत. मला ठाऊक आहे की आरसीबी एकदाही चषक न जिंकल्याने त्याच्यावर प्रेशर आहे. मात्र तो फारच उत्तम खेळाडू आहे," असं डिव्हिलियर्स म्हणाला.