Actress Got Trolled for Marrying Muslim : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या 'जवान' आणि मनोज बाजपेयीचा 'द फॅमिली मॅन' दिसलेली अभिनेत्री प्रियामणिचे लाखो चाहते आहेत. प्रियामणि ही तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखली जाते. प्रियामणिनं 2017 मध्ये मुस्तफा राजशी लग्न केलं. प्रियामणिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लग्नाविषयी अर्थात दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न करण्यावरून करण्यात आलेल्या ट्रोलिंगचा शिकार झाली होती, फक्त तेव्हाच नाही तर ती आजही तिला ट्रोल करतात.
फिल्मफेयरला दिलेल्या एका मुलाखतीत प्रियामणिनं सांगितलं की जेव्हा तिनं फक्त मुस्तफाशी साखरपुडा केला होता तेव्हा त्याविषयी सगळ्यांना सांगण्यासाठी तो फेसबुकवर स्टेटस पोस्ट करण्यासाठी खूप उत्साही होता. जेव्हा त्यानं पोस्ट केली त्यानंतर त्यावर खूप वाईट कमेंट्स येऊ लागल्या. प्रियामणिनं सांगितलं की त्याच्या पोस्टवर लोकांना 'जिहाद, मुस्लिम, तुमची मुलं दहशतवादी होणार, अशा कमेंट येऊ लागल्या होत्या.
प्रियामणिनं सांगितलं की या घटनेचा तिच्यावर खूप परिणाम झाला. तिनं सांगितलं की "हे खूप निराशाजनक आहे, एकाच आंतरजातीय जोडप्यावर का निशाणा साधला जातोय? अनेक टॉपचे कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या जाती आणि धर्माच्या बाहेर लग्न केले आहे. त्यांनी तो धर्म स्वीकारला असेलच असे नाही. धर्माची पर्वा न करता ते फक्त एकमेकांच्या प्रेमात पडले. या सगळ्या विरोधात इतका द्वेष का आहे, हे मला समजत नाही."
प्रियामणिनं एक घटनेचा उल्लेख करत सांगितलं की 'एकदा तिनं ईदच्या निमित्तानं एक पोस्ट शेअर केली होती. तेव्हा लोक म्हणू लागले की तिनं तिचा धर्म बदलून इस्लाम धर्म स्वीकारला आहे. मुळात तुम्हाला कसं माहित की मी कन्व्हर्ट झाली आहे? हा माझा निर्णय आहे. तिनं तिचं म्हणणं मांडत सांगितलं की तिनं या गोष्टीवर जोर दिला की तिनं तिच्या वडिलांना लग्नाच्या आधी सांगितलं होतं की ती बदलणार नाही.' याविषयी सांगत प्रियामणि म्हणाली की 'मी जन्मानं हिंदू आहे आणि कायम आपल्या धर्माचं पालन करेन.' तर प्रियामणिनं हे देखील सांगितलं की 'ती आणि तिचा नवरा दोघेही स्वत: च्या आणि एकमेकांच्या धर्माचा सन्मान करतात.'
प्रियामणिनं सांगितलं की 'लोकं मला विचारतात की मी नवरात्रीला काही पोस्ट का केली नाही. मला नाही माहित की त्याचं उत्तर कसं द्यायचं, पण आता या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही. मला या निगेटिव्हीटीकडे लक्ष द्यायचे नाही.'