सांगलीतल्या बेकायदा गर्भपात प्रकरणी धक्कादायक खुलासा

सांगलीतल्या म्हैसाळ बेकायदा गर्भपात प्रकरणी नवा खुलासा पोलिसांनी केला आहे.

Updated: Apr 27, 2017, 10:09 PM IST
सांगलीतल्या बेकायदा गर्भपात प्रकरणी धक्कादायक खुलासा  title=

सांगली : सांगलीतल्या म्हैसाळ बेकायदा गर्भपात प्रकरणी नवा खुलासा पोलिसांनी केला आहे. बाबासाहेब खिद्रापुरे या बोगस डॉक्टरच्या दवाखान्यात 5 मुली आणि 3 मुलांची भ्रूणहत्या झाल्याचं निष्पन्न झालंय. धक्कादायक बाब म्हणजे गर्भनिदान चाचणीत मुलाचं भ्रूण असलं तरी मुलगी असल्याचं सांगून तो गर्भपात करत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.  

8 भ्रूणांचे डीएनए रिपोर्ट पोलिसांच्या हाती आलेत. यापुढे वैद्यकीय आणि कायदेशीर सल्ला घेऊन तपास करण्यात येईल, असं सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी स्पष्ट केलंय.