'निवडणुकीत झालं ते विसरून जायचं असतं'

निवडणुकीत जे झालं ते विसरून जायचं असतं, अशा शब्दांत नितीन गडकरी यांनी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 23, 2017, 08:08 PM IST
'निवडणुकीत झालं ते विसरून जायचं असतं' title=

नागपूर : निवडणुकीत जे झालं ते विसरून जायचं असतं, अशा शब्दांत नितीन गडकरी यांनी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. 

मुंबईत झालेल्या शिवसेना - भाजप मधील 'तूतू - मैंमैं' आणि जनतेनं आज दिलेला कौल याबद्दल नितीन गडकरी यांन प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, 'निवडणुकीत जे झालं ते विसरून जायचं असतं' असं सूतोवाच गडकरींनी केलंय. 

महाराष्ट्राच्या इतिहासात भाजपला राज्यात मोठं यश मिळालंय. मुंबईत भाजपला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालंय, असंही त्यांनी मान्य केलंय.  

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आशिष शेलार यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळालंय, असं म्हणत त्यांनी मुंबई भाजपचंही अभिनंदन केलंय. 

आमच्या कामाचं जनतेनं स्वागत केलं आणि आम्हाला नागपुरात मोठं यश मिळालं, असंही त्यांनी म्हटलंय.