भाजप कुटुंबाचा नाही तर कार्यकर्त्यांचा पक्ष – गडकरी

आज भाजप प्रदेश कार्यकारणीचा दूसरा आणि समारोपाचा सोहळा सुरु आहे. आजच्या समारोपाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष हजेरी लावत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवलं.

Updated: Jun 19, 2016, 03:17 PM IST
भाजप कुटुंबाचा नाही तर कार्यकर्त्यांचा पक्ष – गडकरी title=

पुणे : आज भाजप प्रदेश कार्यकारणीचा दूसरा आणि समारोपाचा सोहळा सुरु आहे. आजच्या समारोपाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष हजेरी लावत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवलं.

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनीही आगामी काळात संघटनावाढीसाठी प्रत्येकाने झोकून द्या असं आवाहन केल.

गेल्या काही दिवसात शिवसेनेसोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत पक्षाची कार्यकारिणी काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष होत. मात्र या समारोहात सर्वच वक्त्यांनी कार्यकर्त्यांच्या मनोबलावर भर देत संघटनावाढीवर प्रबोधन केले.