हॉटेल, बिअरबार सुरू करणाऱ्यांना दिलासा

हॉटेल, बिअर बार किंवा लॉज बांधणा-यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण यासाठी आता पोलीस परवानगीची गरज लागणार नाही. राज्य सरकारनं याबाबतचं परिपत्रक काढलंय.. पण हे परिपत्रक काढताना कायदा डावलल्याचा आरोप होतोय.

Updated: Jan 21, 2016, 07:39 PM IST
हॉटेल, बिअरबार सुरू करणाऱ्यांना दिलासा title=

नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : हॉटेल, बिअर बार किंवा लॉज बांधणा-यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण यासाठी आता पोलीस परवानगीची गरज लागणार नाही. राज्य सरकारनं याबाबतचं परिपत्रक काढलंय.. पण हे परिपत्रक काढताना कायदा डावलल्याचा आरोप होतोय.

22 डिसेंबरला गृहविभागानं हे परिपत्रक काढलं. त्यानुसार आता राज्यात कुठेही हॉटेल, रेस्टॉरंट, बार किंवा लॉज सुरु करण्यासाठी पोलिसांच्या परवानगीची गरज नाही. पण शासनाचा हा निर्णयाविरोधात विनीत दंडा यांनी कोर्टात याचिका दाखल केलीये.

 

तर हॉटेल व्यावसायिकांनी मात्र या निर्णयाचं स्वागत केलंय. पोलीस परवान्याची अट काढल्यामुळे राज्य सरकारचं उत्पन्न वाढेल असा दावा हॉटेल व्यावसायिकांनी केलाय..

हॉटेल आणि परमिट रुमना मोकळं रान देताना त्यातून डान्स बारना मात्र वगळण्यात आलंय. सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या केसचा अडथळा, हे कारण त्यासाठी देण्यात आलंय. पण सरकारच्या या परिपत्रकानंतर वादाला तोंड फुटलंय, हे नक्की.