शिर्डी : नोटाबंदी होऊनही सहा महिने झाले तरी मोठ्या देवस्थानाच्या दान पेटीत हजार आणि पाचशेच्या नोटा भाविक टाकत आहेत. या पैशांचं काय करायचं असा प्रश्न देवस्थानाला पडला आहे.
शिर्डीच्या साई संस्थान मंदिराच्या दानपेटीत चार महिन्यात 90 लाख 45 हजारांचे जुने चलन जमा झालंय. तर दुसरीकडे मुंबईतील सिद्धीविनायक ट्रस्टकडे साडे नऊ लाखांपेक्षा अधिक जुन्या नोटा पडून आहेत.
आरबीआय आता मंदिरांकडून जुन्या नोटा घेत नसल्याने दानपेटीत आलेल्या लाखो रुपयांचं करायचं काय असा प्रश्न मंदिर समितीला पडला आहे.