नोटा बंदीचा फटका डाळिंबाला बसण्याची शक्यता

नोटा टंचाईने नाशिक जिल्ह्यातल्या डाळिंब विक्रीवर विपरीत परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांना चेकने पैसे दिले जात आहे खरा. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 20, 2016, 07:18 PM IST
नोटा बंदीचा फटका डाळिंबाला बसण्याची शक्यता title=

नाशिक : नोटा टंचाईने नाशिक जिल्ह्यातल्या डाळिंब विक्रीवर विपरीत परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांना चेकने पैसे दिले जात आहे खरा. 

मात्र व्यापाऱ्यांना परराज्यातून पैसा येत नसल्यानं, तिथे माल पाठवणं अवघड होऊन बसलं आहे. 

नाशिक जिल्ह्यातल्या कांदा द्राक्ष आणि डाळिंबाला देशभरातून मागणी आहे. मात्र सध्याच्या नोटबंदीमुळे, व्यापाऱ्यांच्या व्यवहारांवर मर्यादा आली आहे.