मुंबई: स्त्रीशिक्षणासाठी आपलं आयुष्य वेचलेल्या सावित्रीबाई फुले यांचं नाव पुणे विद्यापीठाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं.
गेल्या अनेक दिवसांपासून पुणे विद्यापीठ नामांतराची मागणी होत होती... त्याला आजच्या कॅबिनेटमध्ये मूर्त स्वरुप देण्यात आलं... आता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाईंचं तर सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचं नाव द्यावं, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केलीये.
यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात विद्यापीठाच्या नामांतर प्रस्तावाला विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये मंजुरी दिली होती.
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामांमुळं, सावित्रीबाईंचं नाव पुणे विद्यापीठाला द्यावं, अशी मागणी नामांतर कृती समितीची होती. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी यासाठी लढा उभारला होता. त्यांची ही मागणी आता पूर्ण होताना दिसत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.