नागपुरात गुन्हेगारांवर आता मोका लावणार

गुन्हेगारांचं कंबरडं मोडण्यासाठी नागपूर पोलिसांनी आता मोक्काचं हत्यार उपसलंय. नागपूर पोलिसांनी आज पुन्हा ९ गुन्हेगारांवर मोक्का दाखल केलाय.

Updated: Jan 29, 2016, 09:46 PM IST
नागपुरात गुन्हेगारांवर आता मोका लावणार title=

नागपूर : गुन्हेगारांचं कंबरडं मोडण्यासाठी नागपूर पोलिसांनी आता मोक्काचं हत्यार उपसलंय. नागपूर पोलिसांनी आज पुन्हा ९ गुन्हेगारांवर मोक्का दाखल केलाय.

गेल्या सलग तीन दिवसांत ३ प्रकरणात एकूण २३ आरोपींवर मोक्का दाखल झालाय. पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे गुन्हेगारीवर अंकूश बसण्याची शक्यता आहे. आज मोक्का दाखल झालेल्या गुन्हेगारात राजू भद्रे या डॉनचाही समावेश आहे

त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने अजय राऊतचं अपहरण करत त्याच्याकडे १ कोटी ७५ लाखांची खंडणी वसूल केली होती. याआधी २७ तारखेला नागपूर पोलिसांनी संतोष आंबेकर, युवराज माथनकर आणि अन्य ९ गुन्हेगारांवर मोक्का दाखल केलाय. एका व्यावसायिकाचं घर पाडून ते बळकावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तसंच त्याला जीवानिशी मारण्याची धमकी दिल्याबद्दल मोक्का दाखल झाला होता.

 

काल नागपूर पोलिसांनी गोल्डी ऊर्फ कुलवंत सिंग भुल्लर, पिंटू उर्फ हर्जींदर सिंग भुल्लर आणि जुजार सिंग ढील्लो यांच्या विरोधात मकोका दाखल केला होता. या तिघांवर एका व्यावसायिकाला धमकी देत पैसे लुबाडण्याचा आरोप आहे.