शिर्डी : शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी एका एनआरआय महिलेनं 25 हजार डॉलर्सचे दान अर्पण केले आहे. अमेरिकेतील अनिवासी भारतीय सीता हरिहरण यांनी ही देणगी दिली आहे.
भारतीय मुल्यानुसार ही रक्कम 17 लाखांवर जाते. हरिहरण यांनी धनादेशाद्वारे ही रक्कम साईंच्या चरणी दान केलीय. शिर्डीच्या प्रसादालयात मोफत अन्नदानासाठी ही देणगी देण्यात आली आहे.
शिर्डी साईबाबा संस्थानाकडून मोठ्या प्रमाणात अन्नदान केले जाते, यासाठी सोलर एनर्जीचा वापर केला जातो. हजारो लोकांचं अन्न बनवण्याची क्षमता संस्थानाकडे आहे.