पुण्यात नवा फ्लॅट पाहताना १७ व्या मजल्यावरुन पडून महिलेचा मृत्यू

शहरात नवा फ्लॅट बघताना १७ व्या मजल्यावरुन पडून महिलेचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान,  शहरातील आतापर्यंतची सर्वात उंच ही इमारत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Updated: Jan 10, 2017, 08:33 PM IST
पुण्यात नवा फ्लॅट पाहताना १७ व्या मजल्यावरुन पडून महिलेचा मृत्यू title=

पुणे : शहरात नवा फ्लॅट बघताना १७ व्या मजल्यावरुन पडून महिलेचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान,  शहरातील आतापर्यंतची सर्वात उंच ही इमारत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

अनुश्री पांडे (३५) या पौड फाटा परिसरात कुमार बिल्डरच्या इमारतीमध्ये सदनिका पाहण्यासाठी आल्या होत्या. यावेळी १७ व्या मजल्यावरील सॅम्पल फ्लॅट पाहत असताना अनुश्री यांचा तोल जाऊन त्या पडल्या. ही इमारत ४२ मजल्यांची आहे.

दरम्यान, या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. अनुश्री पांडे ज्याठिकाणी पडल्या तेथे बांधकामाचे साहित्य आणि पत्रे होते. दरम्यान, या घटनेबद्दल माहिती मिळाल्यानंतर कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला.