मुंबई - पुणे महामार्गावर ऑईल गळती, वाहतूक कोंडी

मुंबई - पुणे महामार्गावर खंडाळा बोरघाटात पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. आडोशी बोगदा ते अमृतांजन पुलादरम्यान एका टंकरमधून ऑईल गळती झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 20, 2017, 01:01 PM IST
मुंबई - पुणे महामार्गावर ऑईल गळती, वाहतूक कोंडी title=

खोपोली : मुंबई - पुणे महामार्गावर खंडाळा बोरघाटात पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. आडोशी बोगदा ते अमृतांजन पुलादरम्यान एका टंकरमधून ऑईल गळती झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. परिणामी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

पुण्याकडे जाणारी वाहतुक काही काळ धिम्या गतीने सुरू होती. आडोशी बोगदा ते अमृतांजन पुलादरम्यान ऑईल सांडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता. आयआरबीच्या कर्मचा-यांनी ऑईलवर भुसा आणि माती टाकल्याने वाहतुक सुरू करण्यात आलीय.

मात्र, शनिवार असल्याने वाहनांची संख्या अधिक होती. त्यामुळेही पुण्याकडे जाणा-या प्रवाशांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत होता. सध्या धिम्यातीने वाहतूक सुरु आहे.