गाडीत अडकून पडल्याने तीन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

लहान मुलांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण किती गरजेचं आहे हे पिंपरी चिंचवडमधल्या एका घटनेने दाखवून दिलंय... पिंपरी चिंचवडच्या रुपीनगर मधील तन्मय शिंदे या तीन वर्षीय चिमुकल्याला असाच जीव गमवावा लागलाय.

Updated: Oct 12, 2015, 11:40 PM IST
गाडीत अडकून पडल्याने तीन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू title=

पिंपरी : लहान मुलांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण किती गरजेचं आहे हे पिंपरी चिंचवडमधल्या एका घटनेने दाखवून दिलंय... पिंपरी चिंचवडच्या रुपीनगर मधील तन्मय शिंदे या तीन वर्षीय चिमुकल्याला असाच जीव गमवावा लागलाय.

ही घटना रविवारी घडली. रोजच्या प्रमाणे घरा शेजारील काकांच्या गाडीत तो खेळायला म्हणून बसला आणि गाडीचे दार त्याच्याकडून बंद झाले.

तन्मयने गाडीतून बाहेर येण्यासाठी अथक प्रयत्न केले, मात्र त्यात तो अपयशी झाला. जेव्हा घरच्यांनी त्याचा शोध घेतला तेव्हा तो गाडीत बेशुध्द अवस्थेत आढळला. तातडीने त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.