धुळे : मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टकडून जलयुक्त अभियानासाठी धुळे जिल्ह्यासाठी प्राप्त एक कोटी निधीचा चेक कृषी अधीक्षक प्रकाश सांगळे यांनी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे सुपूर्त केला.
जलयुक्त अभियानात लोकसहभाग वाढविण्यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत अनेक सेवाभावी संस्थांनी, लोकप्रतिनिधींनी लोकसहभागाचं आश्वासन दिले.