औरंगाबाद : औरंगाबादमध्ये रस्ता अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एका तरुणाच्या तीन अवयवांमुळे तीन जीव वाचलेत... राम मगर असं या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे...
बीएससी अॅग्री झालेला राम नोकरीच्या मुलाखतीसाठी अकोल्याला गेला होता. बाईकवरून परत येत असताना त्याला अपघात झाला. त्याला मेहेकर मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं... मात्र तो ब्रेनडेड असल्याचं घोषित करण्यात आलं...
तसंच रामचे अवयव दान दिले जाऊ शकतात, असंही नातलगांना सांगण्यात आलं. त्यावर त्याची आई मंदाबाई यांनी अवघ्या 15 मिनिटांत त्याला होकार दिला. रामला तातडीनं औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात हलवण्यात आलं.
तिथं त्याच्या दोन्ही किडनी आणि लिव्हर काढण्यात आलं आणि एक किडनी आणि लिव्हर मुंबईतल्या जसलोक आणि ग्लोबल रुग्णालात प्रत्यारोपणासाठी पाठवण्यात आल्या. त्यासाठी औरंगाबाद आणि मुंबईत ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला... तर दुसरी किडनी औरंगाबादच्याच धूत रुग्णालयाला पाठवण्यात आली...
रामचं हृदयही चेन्नईला पाठवायचं होतं. मात्र वेळेत विमान उपलब्ध न झाल्यामुळे हृदयाचं प्रत्यारोपण होऊ शकलं नाही.... यामुळे राम आपल्यातून गेला असला तरी तो अवयवांच्या रुपानं कायम जीवंत राहील, अशी भावना त्याच्या नातलगांनी बोलून दाखवली.