ओवेसींच्या पुण्यातील सभेला परवानगी नाकारली

एमआयएमचे खासदार अकबरुद्दीन ओवेसी यांची सभा पुण्यात होणार होती,  येत्या 26 तारखेला होणाऱ्या, या सभेची परवानगी नाकारण्यात आली आहे. 

Updated: Oct 26, 2015, 12:53 AM IST
ओवेसींच्या पुण्यातील सभेला परवानगी नाकारली title=

पुणे : एमआयएमचे खासदार अकबरुद्दीन ओवेसी यांची सभा पुण्यात होणार होती,  येत्या 26 तारखेला होणाऱ्या, या सभेची परवानगी नाकारण्यात आली आहे. 

कोंढवा पोलिसांनी ओवेसींवर आजवर नोंदवण्यात आलेले गुन्हे आणि त्यांनी जातीय तेढ निर्माण करणारी भाषणं केल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. पुण्यातील कोंढवा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी अकबरुद्दीन ओवेसी सभा घेणार  होते. 

कोंढवा हा प्रभाग खरं तर मुस्लीमबहुल मतदारांचा प्रभाग आहे. इथे सुमारे ४२ हजार मतदार आहेत. त्यातले जवळजवळ वीस हजार मतदार हे मुस्लीम आणि पाच ते सहा हजार दलित आहेत. तशातच काँग्रेस आणि एमआयएमने मुस्लीम उमेदवार दिल्यामुळे केवळ एका प्रभागाची असली तरी इथली निवडणूक चुरशीची होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

येत्या एक तारखेला नगरसेवकपदाच्या पोटनिवडणुकीसाठी कोंढव्यात मतदान होणार आहे. शिवसेना, मनसे, भाजप, काँग्रेस राष्ट्रवादी युती, एमआयएम आणि आप असे जवळजवळ सर्वच प्रमुख पक्ष या निवडणुकीसाठी आपलं नशीब आजमावत आहेत. शिवसेनेच्या भरत चौधरी यांचं नगरसेवकपद अवैध प्रमाणपत्रामुळे रद्द झाल्यानंतर ही पोटनिवडणूक घेतली जात आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.