संमेलनाध्यक्षांनी उद्धव ठाकरेंची मागितली जाहीर माफी

पिंपरी-चिंचवडमध्ये 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं मुख्यमंत्र्यांच्य़ा हस्ते उद्घाटन करण्यात आंलं. यावेळी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साहित्य संमेलनाचं निमंत्रण द्यायचं राहून गेल्यानं संमेलन स्वागताध्यक्ष पी. डी. पाटील यांची उद्धव ठाकरेंची जाहीर माफी मागितलीय. 

Updated: Jan 16, 2016, 02:53 PM IST
संमेलनाध्यक्षांनी उद्धव ठाकरेंची मागितली जाहीर माफी title=

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं मुख्यमंत्र्यांच्य़ा हस्ते उद्घाटन करण्यात आंलं. यावेळी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साहित्य संमेलनाचं निमंत्रण द्यायचं राहून गेल्यानं संमेलन स्वागताध्यक्ष पी. डी. पाटील यांची उद्धव ठाकरेंची जाहीर माफी मागितलीय. 

अनावधानानं उद्धव ठाकरेंना निमंत्रण पत्रिका पाठवण्याचं राहून गेलं अशी प्रतिक्रीया पाटील यांनी दिलीय. उद्धव ठाकरे यांना साहित्य संमेलनाचं निमंत्रण द्यायला हवे होते, अशी नाराजी नुकतीच दिवाकर रावते यांनी व्यक्त केली होती. 
 
दरम्यान, यावेळी अध्यक्षपदाच्या निवडीचा पुनर्विचार करावा असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं. समिती नेमून निवड होऊ शकतो का? असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. त्याचप्रमाणे काही घड़लं तरी त्याच्यामागे शरद पवारांचा हात असल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला. मराठी साहित्यिकांबाबबत जहगभरात उत्सुकता आहे. त्याचप्रमाणे आजपासून पुढचे तीन दिवस विविध कार्यक्रमाची मेजवानी साहित्य रसिकांना मिळणार आहे.