बंदूकीचा धाक दाखवून अभिनेत्रीवर सामूहिक बलात्कार

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण इथं नवोदित मराठी अभिनेत्रीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडलीय.

Updated: Jul 14, 2015, 10:53 AM IST
बंदूकीचा धाक दाखवून अभिनेत्रीवर सामूहिक बलात्कार title=
प्रातिनिधिक फोटो

पैठण : औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण इथं नवोदित मराठी अभिनेत्रीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडलीय.

बंदूक आणि तलवारीचा धाक दाखवून एका अभिनेत्रीवर बलात्कार करण्यात आलाय. या अभिनेत्रीची अंबडमधल्या गोविंद चितलांगी या व्यक्तीसोबत ओळख होती. २० दिवसांपूर्वी या अभिनेत्रीला गोविंदने मराठी सिनेमात काम देण्याचं आमिष दिलं होतं. गोविंदनं तिला औरंगाबादमध्ये बोलावून कामही दिलं आणि हॅन्डिकॅमनं काही शूटही केलं.

मात्र, रविवारी या अभिनेत्रीने गोविंदकडे मुंबईला जाण्यासाठी पैशांची मागणी केली. यावेळी गोविंदने तिला पैठणला फिरवून आणण्याच्या बहाण्यानं नेलं. पिंपळवाडी परिसरात गोविंद आणि अभिनेत्रीच्या परिचयाचे आणखी तिघे त्या ठिकाणी आले. 

एका फार्म हाऊसवर गोविंद तसंच इतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तिला कारमधून आणत मध्यवर्ती बस स्थानकामध्ये सोडण्यात आलं. 

या घटनेनं हादरलेल्या अभिनेत्रीनं क्रांती चौक पोलीस ठाण्यात तिघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गोविंद चितलांगी या प्रमुख आरोपीला अटक केलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.