अग्निशमन दलाचे अधिकारी पाळतायत सापाची ६० पिल्लं!

वातावरणातील वाढत्या उष्णतेमुळे माणसांप्रमाणेच प्राणी आणि पक्षीही हैराण झाले आहेत. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या निवाऱ्यावर माणसाने अतिक्रमण केल्यामुळे त्यांचं जीवनचक्र धोक्यात आलंय. कल्याणमध्ये अशीच एक घटना समोर आलीय.  

Updated: Apr 6, 2016, 04:51 PM IST
अग्निशमन दलाचे अधिकारी पाळतायत सापाची ६० पिल्लं! title=

विशाल वैद्य, कल्याण : वातावरणातील वाढत्या उष्णतेमुळे माणसांप्रमाणेच प्राणी आणि पक्षीही हैराण झाले आहेत. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या निवाऱ्यावर माणसाने अतिक्रमण केल्यामुळे त्यांचं जीवनचक्र धोक्यात आलंय. कल्याणमध्ये अशीच एक घटना समोर आलीय.  

कल्याणच्या आधारवाडीतील अग्नीशमन दलाचे कर्मचारी सध्या एक-दोन नव्हे तर तब्बल साठ सापांच्या पिल्लांचा सांभाळ करताना दिसत आहेत. 'पाणदीवड' जातीच्या सापाची ही नवजात पिल्लं आहेत, अशी माहिती सर्पमित्र - अग्निशमन कर्मचारी दत्ता बोनबे यांनी दिलीय. 

कल्याणच्या चिकनघर परिसरातून  अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पाणदीवड जातीच्या सापाची मादी पकडली होती. त्या मादीने साठ अंडी दिली आणि आंड्यातून या पिल्लांनी जन्म घेतला. पाणदीवड जातीचा साप प्रामुख्यानं पाणवठ्याजवळ आढळतात. वाढत्या निवासीकरणामुळे सापांचा निवार संपत चालला आहे.
 
कल्याणमध्ये दररोज फायर ब्रिगेडला साप आढळून आल्याची वर्दी मिळते. सरपटणाऱ्या या प्राण्यांचा आसरा हरवत चालल्यामुळे अंडी घालण्यासाठी हे साप बाहेर येतात. पाणवठ्याच्या पाणदीवड जात आढळत असल्यामुळे वन विभागाचे अधिकारी या पिलांसाठी जंगलात तशा प्रकारच्या जागेचा शोध घेत आहेत. जागा निश्चित झाल्यानंतर या पिल्लांना तेथे सोडण्यात येणार आहे.