पुणे : मी मुख्यमंत्री व्हावे, ही लोकांची इच्छा आहे, असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलतांना सांगितलं. यावरून पंकजा मुंडे यांच्या मनात मुख्यमंत्रीपद रूंजी घालतंय असं म्हणायला हरकत नाही.
"मी मुख्यमंत्री होईन की नाही, हे माहिती नाही, पण मी मुख्यमंत्री व्हावे, ही लोकांची इच्छा आहे, असंपंकजा मुंडे पालवे यांनी रविवारी भारती विद्यापीठातील कार्यक्रमात सांगितलं. जर आज गोपीनाथ मुंडे आपल्यात असते, तर ते नक्कीच मुख्यमंत्री झाले असते", अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पंकजा मुंडे या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हाव्यात, अशा शुभेच्छा सातव यांनी भाषणात दिल्या. हा धागा पकडून मुंडे म्हणाल्या, "गोपीनाथराव मुंडे हे लोकांच्या मनातील खरे मुख्यमंत्री होते. हे कोणालाही नाकारता येणार नाही; पण मी मुख्यमंत्री व्हावे, अशा प्रकारच्या शुभेच्छा कॉंग्रेसच्या नेत्याने मला देणे, हे विशेष आहे. यापुढे आणखी काही वर्षे राज्यात आमचीच सत्ता असेल. केंद्रात जाण्याचा निर्णय मी वेळेवर टाळला, हे बरेच केले असे सध्या वाटते.
भारती विद्यापीठाच्या ५१व्या वर्धापन दिन सोहळ्यात विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांचा सत्कार पंकजा मुंडे पालवे यांच्या हस्ते झाला. या वेळी त्या बोलत होत्या. कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव, विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम उपस्थित होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.