ठाण्यात रुग्णाच्या नातेवाईकांची मारहाण, डॉक्टरांचं काम बंद आंदोलन

डॉक्टरांवरचे हल्ले सुरूच आहेत. ठाण्याच्या शासकीय रुग्णालयात काल डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत निषेध करण्यासाठी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. आरोपींना अटक आणि योग्य सुरक्षा मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा ठाण्यातल्या डॉक्टरांनी निर्धार केला आहे.

Updated: Mar 30, 2017, 06:42 PM IST
ठाण्यात रुग्णाच्या नातेवाईकांची मारहाण, डॉक्टरांचं काम बंद आंदोलन

ठाणे : डॉक्टरांवरचे हल्ले सुरूच आहेत. ठाण्याच्या शासकीय रुग्णालयात काल डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत निषेध करण्यासाठी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. आरोपींना अटक आणि योग्य सुरक्षा मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा ठाण्यातल्या डॉक्टरांनी निर्धार केला आहे.

जिल्हा रुग्णालय असल्यानं अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. पण इतर सेवाबंद ठेवण्यात आल्या आहेत. पोलिसांनी आतापर्यंत डॉक्टर मारहाणी प्रकरणी आतापर्यंत ५ आरोपीना अटक केली आहे. इतर आरोपींना देखील ताब्यात घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितलंय.