पिंपरी-चिंचवडमध्ये मायलेकींना भर रस्त्यात जाळले

पिंपरी-चिंचवडच्या वाकड येथे वडापावची गाडी चालवणाऱ्या मायलेकींना दोन अज्ञात व्यक्तींनी अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना काल रात्री साडे दहा वाजता घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झालीय. 

Updated: May 22, 2015, 05:33 PM IST
पिंपरी-चिंचवडमध्ये मायलेकींना भर रस्त्यात जाळले title=

पुणे : पिंपरी-चिंचवडच्या वाकड येथे वडापावची गाडी चालवणाऱ्या मायलेकींना दोन अज्ञात व्यक्तींनी अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना काल रात्री साडे दहा वाजता घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झालीय. 

या घटनेत दोघीही गंभीर जखमी झाल्या आहेत. योगिता परदेशी आणि त्यांची मुलगी कोयल अशी जखमी मायलेकींची नावे आहेत. याप्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

योगिता या डांगे चौकातून वाकड रोड येथील इव्हाना बिल्डींगसमोर वडापावची गाडी घेऊन पोहोचल्या आणि काही कळण्याआधीच योगिता यांच्यावर रॉकेल ओतले आणि त्यांना पेटवून दिले. आईला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना कोयल सुद्धा जखमी झाली. यामध्ये योगिता या ६० टक्के तर कोयल १० टक्के भाजली आहे. त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.