मध्य रेल्वेसेवा कोलमडली... प्रवासी घामाघूम!

आज पुन्हा एकदा ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. उन्हाळ्याचे दिवस असल्यानं प्रवाशी मात्र घामाघूम झालेत.

Updated: May 22, 2015, 11:55 AM IST
मध्य रेल्वेसेवा कोलमडली... प्रवासी घामाघूम! title=

ठाणे : आज पुन्हा एकदा ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. उन्हाळ्याचे दिवस असल्यानं प्रवाशी मात्र घामाघूम झालेत.

ठाणे प्लेटफॉर्म क्रमांक - २ वर असलेल्या लोकलचा पेंटाग्राफ तुटल्यानं हा रेल्वे सेवेवर हा परिणाम झालाय. दहा-सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडलीय. 
अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गावरील स्लो मार्गावरची वाहतूक ठप्प झालीय. 

पर्यायी, फास्ट ट्रॅकवर ही वाहतूक वळवण्यात आलीय. यामुळे, प्रवाशांच्या गर्दीचा ताण फास्ट रेल्वेवर पडतोय. दोन्ही मार्गावरील लोकल अर्धा तासाहून अधिक उशीरानं धावतायत. 

दरम्यान, प्लॅटफॉर्म क्रमांक १, २, ३ आणि ४ बंद असल्याच्या घोषणा ठाणे स्टेशनवर सुरू आहेत. त्यामुळे, प्रवाशांचा गोंधळ मात्र काहिसा कमी होण्यास मदत झालीय. अनेक प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सुरूवात केलीय.

बिघाड होऊन एक तास उलटून गेलाय... अजुनही काम सुरूच आहे. पण आणखी अर्धा तासात हा बिघाड दुरुस्त होईल, असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.