कोकणात भात पेरणीला सुरूवात

मान्सूनच्या आगमनाबरोबर कोकणात भातपेरणीच्या कामांना वेग आला आहे. सध्या कोकणात शेतीकामांची लगबग सुरु झाली आहे. पावसाने यावर्षी लहरीपणा सोडून व्यवस्थित हजेरी लावावी, अशीच अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत.  

Updated: Jun 12, 2015, 07:18 PM IST
कोकणात भात पेरणीला सुरूवात   title=

विकास गावकर, सिंधुदुर्ग : मान्सूनच्या आगमनाबरोबर कोकणात भातपेरणीच्या कामांना वेग आला आहे. सध्या कोकणात शेतीकामांची लगबग सुरु झाली आहे. पावसाने यावर्षी लहरीपणा सोडून व्यवस्थित हजेरी लावावी, अशीच अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत.  

मान्सूनच्या आगमनाबरोबर कोकणात भातपेरणीच्या कामांना असा वेग आलाय. सिंधुदुर्गात मालवण, कणकवली, कुडाळ, देवगड भागात शेतक-यांनी मशागतीची कामं सुरू केलीय. भात शेतीसाठी सुरुवातीला 'तरवा' पेरला जातो. त्यानंतर तरवा काढून त्याची लावणी केली जाते. मात्र, त्यावेळी मुसळधार पावसाची गरज असते. 

कोकणाचं अर्थकारण बऱ्यापैंकी भातशेतीवर अवलंबून असतं. त्यामुळे पाऊस कसा होतो यावर सर्वांचं लक्ष असतं. गेली काही वर्ष पाऊस अगदी लावणीच्या वेळी दडी मारतो. त्यामुळे यंदा तरी वरुणराजानं समाधानकारक हजेरी लावावी अशी अपेक्षा बळीराजा व्यक्त करतोय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.