'अस्सा वऱ्हाडी माणूस' हरपला... कवी शंकर बडे यांचं निधन

ज्येष्ठ वऱ्हाडी कवी शंकर बडे यांचे आज पहाटे निधन झालं. 

Updated: Sep 1, 2016, 08:33 PM IST
'अस्सा वऱ्हाडी माणूस' हरपला... कवी शंकर बडे यांचं निधन title=

यवतमाळ : ज्येष्ठ वऱ्हाडी कवी शंकर बडे यांचे आज पहाटे निधन झालं. 

ब्रेन हॅमरेजच्या धक्क्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून ते दवाखान्यात भरती होते. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

शंकर उर्फ बाबा बडे गेल्या 45 वर्षापासून कवीतेच्या क्षेत्रात कार्यरत होते. त्यांचे 'मुगुट', 'इरवा', 'सगुण' हे तीन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहे. 

'बॅरीस्टर गुलब्या' या त्यांच्या विनोदी कार्यक्रमाचे 400 तर 'अस्सा वऱ्हाडी माणूस' या कार्यक्रमाचे तीन हजारावर प्रयोग संपूर्ण राज्यभर सादर झालेत.

63 व्या विदर्भ साहित्य सम्मेलनाचे ते अध्यक्ष होते. विदर्भिय बोलीच्या सृजनातून विदर्भ प्रांतातलं लोकजीवन समृद्धपणे साकारण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न त्यांनी केले.  

1947 साली बडेंचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातल्या बोरी अरब या लहानशा खेड्यात जन्म झाला. वऱ्हाडी गीतं पहिल्यांदा लोकप्रिय करण्यामागे बडेंची मोठी भूमिका होती. 

खेड्यातल्या चाली-रीती, परंपरा, सणउत्सव, नातीगोती, गंमती-जमतीची अस्सल अभिव्यक्ती त्यांनी कवितेतून व्यक्त केली. बाबाच्या कवितेनं बहुतांश काव्यगायनाच्या कार्यक्रमातून लोकहृदयात जागा केली.