नागपूर : नागपूर जिल्ह्यातील दोन गावांना नगर परिषदेचा दर्जा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने रोखून धरल्याने नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणूका लांबणीवर जाणे आता निश्चित झाले आहे.
जिल्ह्यातील वाणाडोंगरी आणि पारशिवनी गावांना नगर परिषदेचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. पण निवडणूक आयोगाने या निर्णयाला आव्हान देत न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यावर निर्णय देताना उच्च न्यायालयाने राज्य सरकारचा निर्णय रोखून धरला.