नाशिक : नाशिकमध्ये वाळूमाफिया किती मुजोर झालेत, याच्या धक्कादायक घटना गेल्या काही दिवसांत पुढे आल्यायत. पण 'मार्च एन्ड'चं टार्गेट पूर्ण करण्यासाठी अचानक महसूल विभागाच्या कारवाया वाढल्यात. खुद्द महसूल विभागाचे कर्मचारीच तसं दडपण असल्याचं सांगतायत.
वार - बुधवार
तारीख - २५ मार्च
गुन्हा - नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पळसे गावाजवळ अवैध रित्यावाळू घेऊन जाणाऱ्या वाळू माफियाकडून मंडल अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी.. नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...
वार - रविवार
तारीख - २९ मार्च
गुन्हा - अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळूचा ट्रक अडवणाऱ्या तलाठी अनिल पाटील यांना मारहाण करत चालत्या ट्रक मधून ढकलून दिलं... अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...
वार - रविवार
तारीख - २९ मार्च
गुन्हा - नंदुरबारहून मुंबईच्या दिशेने अवैध रित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रक अ़डवणाऱ्या मंडळ अधिकारी शेख सईद शेख रहीम शेख आणि तलाठी सुनील चंडोले यांना धक्क्बाबुक्की आणि मंडळ अधिकाऱ्याला मुंबईच्या दिशेने जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न...
हे सगळं घडतंय नाशिक जिल्ह्यात... वाळू माफियांची ही अरेरावी... मुजोरी... पण, सध्या महसूल यंत्रणा कामाला लागलीय, याची ही पावती देखील आहे. अचानक सुरू झालेल्या या कारवाईने वाळू माफियांच्या पायाखालची वाळू सरकलीय. पण वाळू माफियांच्या प्रतिकारानं महसूल यंत्रणा धास्तावलीय.
फेब्रुवारी - मार्च या दोन महिन्यातच वाळू माफिया विरोधातल्या गुन्ह्यांची संख्या ६ झालीय. मार्च एन्डच्या आसपास कारवाई जोमात असल्याचं स्पष्ट होतंय. कारवाईचं टार्गेट पूर्ण करण्याचं प्रेशर असल्याचीही चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे.
महसूल यंत्रणेच्या कामगिरीच जिल्ह्यत कौतुक होत असलं तरी वर्षभर कारवाई का केली जात नाही? वाळू माफियांची मुजोरी वाढण्याची कारणं काय? थेट वाळू माफियांवर कारवाई का होत नाही? अवैधरित्या होणाऱ्या वाळू उपशाला कोणाचा आशीर्वाद आहे. सरकारी यंत्रणा त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष का करते? असे असंख्य प्रश्न नागरिक उपस्थित करतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.