पोलिसांची डान्सबारवर धाड, 4 बारचे परवाने रद्द होण्याची शक्यता

डोंबिवलीत कल्याण शीळफाटा रोड आणि मलंगगड रस्त्यावर डान्स बार बंदी धाब्यावर बसवून सर्रास डान्सबार सुरू होते. या बारमध्ये अश्लील धिंगाणा सुरू होता. अखेर पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत कारवाई केलीय. 

Updated: Apr 22, 2015, 05:50 PM IST
पोलिसांची डान्सबारवर धाड, 4 बारचे परवाने रद्द होण्याची शक्यता title=

डोंबिवली: डोंबिवलीत कल्याण शीळफाटा रोड आणि मलंगगड रस्त्यावर डान्स बार बंदी धाब्यावर बसवून सर्रास डान्सबार सुरू होते. या बारमध्ये अश्लील धिंगाणा सुरू होता. अखेर पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत कारवाई केलीय. 

इंद्रप्रस्थ, पिंगारा, रसिला आणि इगो या बारचे परवाने रद्द करण्यासाठीचा अहवाल मानपाडा पोलिसांना ठाण्याचे आयुक्त तसंच एक्साईज विभागाला पाठवला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे बारमालकांचं धाबं दणाणलंय. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच या चार बारपैकी इंद्रप्रस्थ बारमध्ये मानपाडा पोलिसांचे दोन कॉन्स्टेबल रासलीला करताना पकडले गेले होते. 

त्यामुळे या सर्व डान्सबारना पोलिसांचेच आशीर्वाद असल्याची बाब उजेडात आली होती. त्यामुळे पोलिसांच्या अडचणीत वाढ झाली होती. त्यानंतर खडबडून जागं झालेल्या पोलिसांनी तातडीने ही धडक कारवाई सुरू केलीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.